संस्था विषय
श्री रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्या साहित्याची व अध्यात्माची भक्तांना व्यवस्थित माहिती व्हावी यासाठी श्री रंगनाथ स्वामी मठ ,निगडी हा १९५४ साली स्थापन केला असून यांचा A ११५४ हा रजिस्टर क्रमांक आहे. ट्रस्ट हा मुख्यतः मंदिराची व्यवस्था, समाधीची व्यवस्था, श्री स्वामीसाठी व भक्तांसाठी विविध धार्मिक कार्ये, अन्नदान ,गोसेवा, मुक्या प्राण्यांची सेवा , आरोग्य शिबीरे, व इतर समाजिक कार्यासाठी मदत करतो. या ट्रस्टचे दरवर्षी ऑडीट केले जावून चॅरिटी कमिशनर , सातारा यांना दिले जाते .स्वामींच्या कार्यासाठी ४ ट्रस्टी , सेवेकरी , ग्रामस्थ भक्त मदत करत असतात.