संस्था विषय

समाज प्रबोधनासाठी आपले जीवन समर्पित केलेले व आपल्या तपश्चर्येतून सामाजिक परिवर्तन घडवणारे , तसेच ज्यांना तुझ्या घोड्याचा खूर ज्या ठिकाणी पाषाणात उमटेल ती कर्मभूमी समजून तेथे वास्तव्य करावे , असा श्री दत गुरूंनी स्वतः आदेश दिलेले निगडी , ता . कोरेगाव , जि .सातारा येथील समर्थ पंचायतनापैकी एक श्री रंगनाथ स्वामी यांचा जन्म नाझरे, जिल्हा सोलापूर येथील प्रसिद्ध देशपांडे घराण्यात झाला.अत्यंत प्रासादिक साहित्य रचना हे श्रीरंगनाथ केली आहे. आपल्या गुरूच्या आज्ञेनुसार त्यानी निगडी येथे वास्तव्य केले. समाधी मंदिर परिसरात घोड्याचा खूर आजही त्याची साक्ष देतो.

        श्री सद्गुरू निजानंद श्रीरंगनाथ स्वामी यांचा प्रतिवर्षी पुण्यतिथी उत्सव निगडी येथे दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा केला जातो . या काळात ज्ञानेश्वरी पारायण,महारुद्र,महानैवेद्य ,भजन,पूजन,कीर्तन, गायन व येणाऱ्या सर्व भक्तजनांची निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था श्रीरंगनाथ देवस्थान ट्रस्ट मार्फत व सर्वांच्या सहकार्याने केले जाते. निगडी ( रंगनाथ स्वामी ) या देवस्थास स्वतःचे उत्पन्न नाही. गोसावी परिवार , भक्तजन , सर्व ग्रामस्त बंधू-भागिनी यांच्या मदतीने वार्षिक उत्सव व देवस्थानाची सर्व व्यवस्था चालू ठेवली आहे . समाधी स्थानांचा जिर्णोदार करण्यात आला असून मंदिराची संपूर्ण दुरुस्ती , रंगरंगोटी , भोजनगृह , सभागृह , अथितीगृह , भक्तनिवास अशी विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत . तसेच संपूर्ण परिसरात विधुतीकरण , पिण्याचे पाणी व सी. सी. टी. व्ही. या सुविधा उपलब्ध केल्या आहेत.समाधी स्थानाचे पर्यटन स्थळात रूपांतर होण्यासाठी अनेक विकासकामे करणे अत्यावश्यक आहे. तरी सदर कार्यास सर्व भक्तजनांची सढळ हाताने मदत करावी व सत्कार्यास हातभार लावावा.

नियोजित कामे 

  • श्रींच्या मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस तटरक्षक भिंत उभारणे. 
  • दक्षिणेकडील जागेचे व्यवस्थापन व बगीचा. 
  • बजरंग हॉल, फरशी दुरुस्ती व पत्रा बदलणे. 
  • अन्नपूर्णा हॉल दुरुस्ती व विस्तारीकरण.
  • अत्याधुनिक शौचालय बांधकाम करणे. 

संस्था मंडळ

अधीक माहितीसाठी येथे बघा